(SHe-Box 2.0) एक सुरक्षित, गोपनीय आणि वापरण्यास अतिशय सोपे असे पोर्टल आहे. या पोर्टलमुळे महिलांना कोणतीही भीती, लज्जा न बाळगता अथवा कोणी आपला सूड उगवेल याचे भय न बाळगता घटनेची तक्रार करण्यास बळ मिळते
महिलांसाठी सुरक्षित, सर्वसमावेशक आणि सशक्त परिसंस्था – SHe-Box 2.0 (संक्षिप्त सारांश)
- केंद्र
सरकार महिलांसाठी
सुरक्षित, सन्मानजनक
आणि सर्वसमावेशक कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
- महिलांच्या आर्थिक
सक्षमीकरणासाठी आणि रोजगारातील सातत्यपूर्ण सहभागासाठी सुरक्षित
कार्यस्थळांवर भर देण्यात आला आहे.
- मिशन
शक्ती अंतर्गत
महिलांची सुरक्षा, संरक्षण
आणि सक्षमीकरणासाठी विविध योजना आणि संस्थात्मक यंत्रणा एकत्रितपणे राबवल्या
जात आहेत.
- कामाच्या
ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई
आणि निवारण) अधिनियम, 2013 (POSH Act) प्रभावीपणे
राबवण्यासाठी SHe-Box 2.0 पोर्टल
विकसित करण्यात आले आहे.
- पूर्वीच्या
SHe-Box
पेक्षा SHe-Box 2.0 अधिक
व्यापक, पारदर्शक
आणि उत्तरदायी डिजिटल तक्रार निवारण प्रणाली उपलब्ध करून देते.
SHe-Box 2.0 ची प्रमुख वैशिष्ट्ये
- कार्यस्थळी
लैंगिक छळाच्या तक्रारी ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा.
- तक्रारींच्या
प्रगतीवर ऑनलाइन देखरेख ठेवण्याची सुविधा.
- राज्य
व जिल्हा स्तरावरील नोडल अधिकाऱ्यांमार्फत
विकेंद्रीकृत देखरेख.
- सरकारी, जिल्हा
तसेच खासगी संस्थांतील अंतर्गत समित्यांचा (Internal Committees) सर्वसमावेशक
डेटाबेस.
- जिल्हास्तरीय स्थानिक
समित्यांचा (Local
Committees) समावेश.
- सुरक्षित, गोपनीय
आणि वापरण्यास सुलभ इंटरफेस.
- महिलांना
कोणत्याही भीतीशिवाय किंवा सूडभावनेच्या धास्तीशिवाय तक्रार नोंदविण्याची
सुविधा.
- हिंदी, इंग्रजीसह
२२ भाषांमध्ये पोर्टल उपलब्ध.
उद्दिष्ट
महिलांसाठी
सुरक्षित, पारदर्शक, सुलभ आणि विश्वासार्ह तक्रार
निवारण व्यवस्था निर्माण करून त्यांच्या सुरक्षा, सन्मान आणि सक्षमीकरणाला बळकटी देणे.
प्रविष्टी
दिनांक: 17 जून 2026स्रोत: PIB मुंबई.