कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे मार्गदर्शक सूचना जारी
मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्रीय मंत्रालये , रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष , सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव/प्रशासक यांच्याद्वारे अपेक्षित कार्यवाहीसाठी आठ प्रमुख बाबींवर भर मार्गदर्शक सूचनांमधील शिफारशींवर कार्यवाही करण्याचे आवाहन करत सूचनांच्या अंमलबजावणीबाबत प्रगतीचा अहवाल दोन महिन्यांमध्ये सादर करण्याचे एनएचआरसीचे निर्देश नवी दिल्ली , 27 ऑक्टोबर 2026 राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) , दहा केंद्रीय मंत्रालयांचे सचिव , अध्यक्ष , रेल्वे बोर्ड आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव / प्रशासक यांना कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कठोर कायदे अस्तित्वात असूनही , कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांची सुरक्षा ही अजूनही चिंतेची बाब असल्याचे एनएचआरसीने म्हटले आहे . भारतात नुकत्याच पार पडलेल्या पिरियॉडिक लेबर फोर्स पार्टिसिपेशन सर्व्हे , अर्थात मनुष्यबळ सहभाग सर्वेक्षणानुसार , सप्टेंबर 2026 मध्ये मनुष्यबळामध्ये महिलांचा सहभाग 34.6% इतका...